ती सध्या काय करते? (Version 1.5 )

ती सध्या काय करते?
(Version 1.5 )

तीच्या आणि त्याच्या प्रेमात जात एखाद्या दुभाजकाप्रमाने आड आली अन दुभंगून गेले त्यांचे आयुष्य...
तीचे ही झाले लग्न वडिलांच्या मर्जीने नात्यातल्याच् कुणा मुलाशी
आज तीचीही मुलगी झालीये 15-16 वर्षाची...
ती सतत ठेवत असते तीच्या मुलीवर लक्ष...
अधून मधून चेक ही करत असते तीच्या मित्र-मैत्रिणीच्या जाती...
कारण तिला वाटत राहते तीच्या तरुण मुलीची काळजी
जे स्वतःच्या वाटेला आलं तेच न यावं मुलीच्या वाटेला म्हणून...
ती जपते तिला आईच्या मायेने...
ती नसेल ही मानत जातिभेद पण तिला माहीत आहेत तीच्या पतीची तत्वे...
तिच्याच वडीलाप्रमाणे आहेत ते ही...
तिला स्वतः ला बसलेल्या ठोकरेचे रक्त भळभळते आहेच अजूनही...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.4 )

ती सध्या काय करते...?
(Version 1.4 )

तिचं नाही होऊ शकलं त्याच्याशी लग्न...
खुप प्रयत्न केलेत दोघांनीही...
नाहीच तयार झाले घरचे तीच्या त्याच्यासोबतच्या लग्नाला...

ती नव्हती तोड़ू शकत नात्याची बंधने...
मग नाइलाजाने घालावा लागला हार दुसऱ्याच्या गळ्यात...
तिनेही सुरु केला तिचा संसार...
सर्व नाते, परंपरा, चालीरिती, सर्वांची मने सांभाळते ती हसऱ्या चेहऱ्याने..
फक्त तीचेच मन नाही सांभाळता आले कुणाला....

तिने केले सर्व निमुटपने सहन...
कारण ती विरोध करु शकत नव्हती...
कुणाचे मन मारु इच्छित नव्हती
ती दगाही देत नाही तीच्या झालेल्या नवर्याला...
तिने एकदाच दगा दिला स्वतःच्याच मनाला...

ती देतेय साथ शरीराने नवऱ्याला
मन तीचे मात्र तसेच अडकून "त्याच्यातच"
कायमचे....
ती देत असते कधी कधी नशिबाला दोष...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.3 )

ती सध्या काय करते...?
(Version 1.3 )

ती कधीच विसरुन गेली त्याला...
उगीच रडत-कुढत जगून काय उपयोग असंच वाटत तिला...
तीच्या आता हे ही लक्षात नाही की तिला आणि त्याला अलग होऊन 5-7 वर्ष झालीत ते...
तीच्या नवर्याचा मस्तपैकी बंगला आहे...
फोर व्हीलर ने दर रविवारी जातात ते फिरायला....
मस्त मज्जा करतात...
तिचा नवरा कुठल्या बड्या कंपनीचा मॅनेजर आहे...गलेलठ्ठ पगार येतो त्याचा...
कपडे लत्ते, शॉपिंग, सिनेमा, टूर सर्वच करता येतं त्यांना...
ती खरंच खुप सुखी आहे,
Enjoy करते आहे ती...
सर्वच आहे तिच्याकड़े...
नसेल तर  फक्त त्याचे प्रेम आणि प्रेमाच्या आठवणी...
आणि त्याची गरज पण नाही तिला...
ती मजेत आहे...!
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.2 )

ती सध्या काय करते...?
(Version 1.2 )

ती आता वेचत असते कपाशी
करते पिकाची खुरपणी
तुरीची कापणीही जमते तिला
गव्हाची सोंगणी, जनावरांचे शेंणपाणी
सगळी कामे करते ती
एव्हढच नाही तर चूल (sorry, गॅस) आणि मूल ही सांभाळते ती
दोन लेकरांची आई आहे ती आता...
कित्येक जबाबदाऱ्या आहेत तिच्यावर
त्यासाठी धडपडत असते ती...

मला माझे करियर बनवायचे आहे
असे सांगून गेली होती ती त्याला सोडून
तिने बराच प्रयत्न करुन ही नाही मिळाली नोकरी
मग बापाने ज्याच्याशी गाठ बांधली त्याच्याशी निमुटपने सुरु केला संसार तीने

आज इतक्या वर्षानंतरही
कधी कधी तीचे मन उगीच बैचेन होते...चुकल्याचुकल्या सारखं वाटतं...
काहीतरी राहून गेलं असं उगीच मनाला वाटत राहतं...
तिला त्याची आठवण येत असेल का...?
करिअर चे निम्मित सांगून आपण त्याच्यापासून दुरावलो ह्याची खंत तर नसेल वाटत तिला...?
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.1 )

ती सध्या काय करते...?
(Version 1.1 )

ती एक चांगली डॉक्टर आहे...
एक नामी डॉक्टर म्हणून नाव आहे तीचे शहरभर...
सर्वच रोगांवर तिला करता येतात अचूक इलाज...
प्रसन्न हसरा चेहरा...सहज मिळून मिसळून वागणारी ती...
तीचे आणि त्याचे मार्ग झालेत वेगवेगळे...
पाच-दहा वर्ष होऊन गेले असतील...
मात्र सर्व रोगांवर अचूक इलाज करायला शिकलेली ती, तिला अजून नाहीच जमले तीच्या मनातल्या रोगांवर इलाज करायला...
त्याचा विषय आला की ती होऊन जाते बैचेन...
सरकन संपूर्ण इतिहास डोकावयाला लागतो वर्तमानात...
तीच्या अन्तर्मनात त्याची छबी अजून ही तशीच...
जणू कालच भेटलो त्याप्रमाण...
ती अचानक मेडिकलच्या पुस्तकाची पाने भराभर पालटून शोधत राहते अशी एखादी tablet...
जिने ठेवता येतील का त्या क्षणांना जिवंत...
जोड़ता येतील का कुठले ऑपरेशन करुन त्या क्षणांना ह्या क्षणाशी...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.0)

ती सध्या काय करते...?
(Version 1.0)

ती तशी बरीच बदललीय
बरीच mature झालीये
तिचा तो सडपातळ बांधा बनलाय काहीसा स्थूल...
चेहऱ्यावर वयाची सावलीही जाणवतेय काही प्रमाणात...
ओढणी सांभाळत कॉलेजात वावरणारी ती आता बिनधास्त वावरते घरादारात...
टापटीप राहणारी ती थोडीसी करते आता चालढकल नटण्या-थटण्यात...
सणावाराच्या निमित्ताने जेव्हा माहेरीं गेल्यावर तिला आठवतात त्या 8-10 वर्षांपूर्वीच्या आठवणी...पण तेवढ्यापुरत्याच...
ती परत स्वतःला गुंतून घेते तिच्या संसारात...जबाबदार्यात...
क्षण कितीही सुवर्णासारखें असले तरी क्षणच ते...निसटतातच ओंजळ रिकामी ठेवून...
आठवणींची कुपी मात्र ठेवलीय तिनेही जपून तिच्या अंतर्मनात... कधी उघडली कि अजूनही दरवळतो त्यातून प्रेमाचा सुगंध...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...