माझा कवितासंग्रह...

नमस्कार मित्रांनो,
माझा "स्पंदने हृदयाची" हा माझ्या निवडक 51 कवितांचा कवितासंग्रह (ebook) मकर संक्रान्तीला प्रकाशित झाले आहे.
माझा हा कवितासंग्रह pdf मिळवण्यासाठी पुढील ठिकाणी आपले नाव व ठिकाण कळवून मागणी नोंदवा
Email: rajesh.khakre@gmail.com
Whatsapp : 7875438494

 किंवा comments मध्ये तुमचा ईमेल आय डी लिहा

आपला - राजेश खाकरे

मग त्याने उधारीचा हिशोब केला...

 मग त्याने उधारीचा हिशोब केला

ती निघुन गेल्यावर विरह त्याला खूप झाला
अश्रू पुसून मग त्याने उधारीचा हिशोब केला

प्रेमापेक्षा जरा जास्त उधारीच झाली होती
ती गेली निघून, याद नि यादी राहिली होती

जास्त वेळ अश्रू ढाळून फार काही उपयोग नव्हता
"भिकारडा कुठला" पदवी देऊन तिने हात सोडला होता

खरंच तो तिच्या प्रेमाने भिकारीच झाला होता
चहावाला, भेळवाल्याचा खातेदार झाला होता

हॉटेलवाले,आईस्क्रीम वाले तगादा लावत होते
फाटका खिसा बघून त्याला अश्रू आवरत नव्हते

दिलाचे तुकडे जोडत बसावे कि उधारी फेडत बसावे
तिच्यावर रुसावे कि विरहात सुतक धरुन बसावे

काहीच त्याला उमजत नव्हते काही समजत नव्हते
कसे अडकलो मायावी प्रेमात काहीच त्याला कळत नव्हते

भावना, ह्र्दय, साथ,हे शब्द त्याला आठवायला लागले
मनाशीच काही ठरवून मग त्याने हॉटेल गाठले

इथेच कपबशा धुवून म्हटला उधारी थोडी फेडूया
पुन्हा चरबी वाढली जर कधी नव्याने प्रेमात पडूया
©  राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

मी फेकले ते शब्द अन कविता ती काय झाली

 मी फेकले ते शब्द ....

मी फेकले ते शब्द अन कविता ती काय झाली
माझ्याच वेदनांना मग वाह वाह ती मिळाली

हृदयातल्या भावना सुस्कारा देत आल्या
गोंजारता मी तयांना वेदना मधुर झाल्या

आले कितीक स्वार्थी फ़ायदा करुन गेले
मी काही न बोलता,मज महान ते म्हणाले

भावनेतही भेद होतो मज रुचले न पचले
मनावर फार न घेता त्यांनी साधून घेतले

ही जगरहाटी नित्य अशी चालतच असते
वेडे मन हे माझे त्यास समजत काही नसते

मी रोज रोज असाच जगाकड़े नव्याने बघतो
ठोकर खाऊन पुन्हा, धड़ा नव्याने शिकतो
© राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

प्रेम कुणावर करावे...?

प्रेम कुणावर करावे...?

आईच्या सुरकुत्या पडलेल्या चेहर्यावर
बापाच्या करारी, स्वाभिमानी बाण्यावर
प्रेम करावे तिने मनात जपलेल्या स्वप्नावर
आणि बापाच्या निथळलेल्या घामावर

प्रेम कुणावर करावे...?

तिने हार घालून दिलेल्या आयुष्यभराच्या साथीवर
जळत राहते आपल्यासाठी त्या तिच्या मनातल्या वातीवर
तिच्या निखळ हास्यावर, गुलाबी क्षणांवर
उरात जपलेल्या,राबत असलेल्या तिच्या मनातील विश्वासावर

प्रेम कुणावर करावे...?

या विश्वात जे जे सुंदर त्या प्रत्येक चांगूलपणावर,
फुलावर,कळीवर, मधुर त्या बासरीवर
नदीच्या काठावर,गाणाऱ्या ओठावर,
आपल्या आयुष्यात घोंगावणाऱ्या कठीण संकटावर

प्रेम कुणावर करावे...?

प्रेम प्रेमावर करावे,तसेच द्वेषावर करावे,
आत रुतत जाणाऱ्या काट्यावर करावे
प्रेम इतके करावे,मनोमन स्मरावे,
हिशोब शेवटी लावता केवळ प्रेम उरावे
केवळ प्रेम उरावे...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
www.rajeshkhakre.blogspot.com

खरंच किती दांभिक असतो ना आपण...

खरंच किती दांभिक असतो ना आपण...

इलेक्शनात उभे असलेल्या उमेदवाराने दिलेल्या दोन हजाराच्या दोन नोटा त्याने हळूच बायकोकडे सरकवल्या आणि चहाचा झुरका घेऊन तो ओट्यावर गप्पात रंगलेल्या घोळक्यात सामील झाला...
चालू असलेल्या विषयाला हात घालत तो म्हणाला, "कुणालापण निवडून द्या, तो काही विकास नाही करत....आपल्या समस्या आजही त्याच आहेत ज्या 50 वर्षांपूर्वी होत्या..सर्व एकाच माळेचे मणी"

किती दांभिक असतो ना आपण...

दोन वर्षांपासून तो काम करत असलेल्या पक्षातून त्याला उमेदवारी नाही मिळाली म्हणून त्याला ज्या पक्षाने उमेदवारी देऊ केली त्या तिकिटावर आहे तो उभा, काल त्याच्या गळ्यात वेगळ्याच कलरचे उपरणे होते, आजच्या उपरण्याचा कलर वेगळा आहे, त्याची भाषा मात्र नाही बदलली अजून, त्याला अजूनही विकासच करायचा आहे, असे तो म्हणतो, अगदी सकाळी सकाळी प्रचारासाठी तो हजर असतो गावात.त्याचा एकच ध्यास आहे म्हणे...तिथल्या भागाचा विकास...

किती दांभिक असतो ना आपण...

आमच्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आम्ही मुकाट बघत असतो, कधी त्याचा एक हिस्सा ही बनतो, त्या सहन ही करत असतो, फक्त त्याच्यावर बोलायचे नाही, उगीच कशाला, आपल्याला काय करायचे नुसत्या वादात पडून म्हणून सोडून देतो, वरवर मात्र आम्ही अतिशय सभ्य असतो..!

खरंच किती दांभिक असतो ना आपण...
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...