नया साल...


नया साल आ रहा है दोस्तो...

नया साल आ रहा है दोस्तो, किस-किसका स्मरण करु
हँसाया रुलाया मुझे, उनका शुक्रिया अदा करु

देता है हंसी मुख पर प्यारा जो लगता है
सुख दुःख कि राह मे दुलारा बन जाता है
उनके उस प्यार का अहसान कैसे चुकाऊं
हँसाया रुलाया मुझे, उनका शुक्रिया अदा करु

ये साल भी हर साल क्यो बदलता रहता हैं
नये फिर 365 दिन हमे और दे जाता है
पलट गया जो अपनी बात से उनसे क्यो खपा रहू
हँसाया रुलाया मुझे, उनका शुक्रिया अदा करु

ये दुनिया भी दोस्तो मुझे नजीब सी लगती हैं
अच्छे बुरे कई सारे ख्वाब हमे दिखाती है
जीवन प्यारा सपना यह साकार गर मैं करु
हँसाया रुलाया मुझे, उनका शुक्रिया अदा करु

छोटी सी इस जिंदगी में कुछ दिन ठहरना हैं
अभी जी रहे शान से एक दिन तो मरना है
कुछ ऐसा कर जाऊ जो दिल में ठिकाना कर जाऊ
हँसाया रुलाया मुझे, उनका शुक्रिया अदा करु
© राजेश खाकरे
Mo 7875438494

नवीन वर्ष येतंय...

नवीन वर्ष येतंय...
फक्त एक दिवस राहिला या वर्षाचा. अजून एक दिवसाने नवीन वर्ष येईल. शुभेच्छांचा पाऊस पडेल फेसबुक, whatsapp वर... बरेच नववर्षाचे मॅसेज फॉरवर्ड होतील... 31st च्या पार्ट्या होतील, दारु,नाचगाणी बरंच काही होईल...कुणाला म्हटलं तर तो लगेच म्हणेल अरे म्हणजे काय नवीन वर्ष येतंय, enjoy तर बनता है यार...
खरं तर वर्षाच्या शेवटच्या कडाला उभे राहून वर्षभराकडे बघितले तर बर्याच गोष्टी एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे नजरेसमोरून सरकून जातात...काही सुखद आठवणी हळूच स्पर्श करुन जातात.काही प्रसंग, घटना उगीच मनाला हळवं बनवतात... मन शोधत राहते त्या तारखांत जगलेले जीवन...खरंच किती जगलो आपण या 365 दिवसांत...
कितीदा हसलो असेल...आनंदात भिजलो असेल...कितीदा रडलो असेल...कोलमडलो असेल...पुन्हा उभा राहिलो असेल...कधी माझ्यामुळे कुणाच्या चेहर्यावर हास्य उमलले असेल...कोणाच्या डोळ्यांत माझ्यामुळे अश्रूही आले असतील...कुणाला मी कधी कुठली प्रेरणा दिली असेल तर कधी मी कुणाकडे बघून उभारी घेतली असेल... कुठल्या एखाद्या दिवसाने शिकवले असेल इथले वास्तव व्यवहारज्ञान...कधी खाल्ली असेल ठोकर आणि अधिकच वाढली असेल समज...
कुणी भेटला असेल पाठीशी उभे राहणारा...कुणी सोडून गेला असेल... काही कामे झाली असतील काही तशीच यादी बनून राहिली असतील...
प्रत्येक दिवस उलटून जातांना त्यांनी बरेवाईट अनुभव सोडलेलेच असतात पाठीशी...
काळ हि एक अद्भुत गोष्ट आहे...जेव्हा वेळ जावा असे वाटते तेव्हा क्षण हि मोठा वाटतो आणि जेव्हा वेळ हवी असते तेव्हा वर्ष, महिने ही क्षणाप्रमाणे सरकून जातात.काळ मात्र कधीच थांबत नाही...कुणासाठीच...खरंतर तो टिकटिक ही नाही करत...तो शांत, निश्चीलपणे सरकत असतो पुढेपुढे. मागे एक धूसर रेषा सोडत जातो..रॉकेटप्रमाणे...हळूहळू धूसर होणाऱ्या...त्यांनाच आपण आठवणी म्हणतो...या आठवणी मात्र कायम टिकून राहतात...कालातीत बनून...
नव्याचे स्वागत करायला सर्वच होतो आपण सज्ज...अशा स्वागत केलेल्या कितीतरी वर्षांनाही आपणच दिलेला आहे निरोप दरवर्षी...आता पुन्हा नवीन 365 दिवस येताहेत आपल्या हातात...नव्या जोमाने करु आपण सर्व त्याचे स्वागत पण त्यापूर्वी घेऊ आपण जुन्या वर्षांचा आढावा या वर्षात मी काय कमावले काय गमावले...काय ध्येय होती...कितपत साध्य झाली...किती प्रयत्न केले...किती यश मिळाले...कितीदा पराभव पत्करावा लागला...कितीदा मुसंडी मारली...काय शिकलो या वर्षात...? कोण कोण सोबत होते या प्रवासात...या सर्वांची गोळाबेरीज करुच या कोपर्यावर बसून.... दोन अश्रू ढाळायचे राहिले असतील...थोडंसं हसायच बाकी असेल ते सर्व करुच...या कडेला बसून...
एक नवीन सूर्य दिसतोय 2017 च्या वर्षात त्याचे स्वागत करुया आनंदाने...हसतमुखाने...सामर्थ्याने... नवउल्हासाने...
सरत्या वर्षाला हृदयात जपून करुया पदार्पण एका नवीन 365 दिवसात...एका नव्या वर्षात...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

नशीब म्हणालं मला...

नशीब म्हणालं मला...

नशीब म्हणालं मला तुला कारणे दाखवा नोटीस देईन
तु माझी फजिती करतोस म्हणून सोय तुझी पाहीन

बाकी बघ कसे मी ठेवेन तसे राहतात,
मस्त मजेत सर्व खातात आणि पितात
तु जास्तच शहाणा निघालास मी तक्रार तुझी देईन
तु माझी फजिती करतोस म्हणून सोय तुझी पाहीन

तु एकटाच वेगळा मूर्ख तुझ्याच धुंदीत जगतोस
माझी पर्वा न करता तुझ्याच तालाने नाचतोस
एकदाची अद्दल घडवून ठिकाणावर तुला आणीन
तु माझी फजिती करतोस म्हणून सोय तुझी पाहीन

मी रोज तुझ्या आयुष्यात दुःखाची पेरणी करतो
तु औषध फवारणी करुन सुखाचे पिक काढतो
तू असाच वागत राहिलास तर माझी किंमत काय राहीन
तु माझी फजिती करतोस म्हणून सोय तुझी पाहीन

मी हसत हसत म्हणालो बस झालं नशिबराव
आमच्यापुढे तुमचं काही नाही चालणार राव
तु लाख दिलेल्या दुःखाला खिशात घेऊन फिरीन
तु माझी फजिती करतोस म्हणून सोय तुझी पाहीन

नको मला तुझी ती सुखाची कंदमुळे
जगेन आनंदाने सोसून काटेरी सुळे
हास्य माझ्या ओठावर अन मनात ही तुला दावीन
तु माझी फजिती करतोस म्हणून सोय तुझी पाहीन

चल ना आपण दोघे एकदा मैत्री करुन बघू
तु कसा बदलतो ते अवघ्या जगाला सांगू
माझ्याही सामर्थ्याची मग प्रचिती तुला येईल
तु माझी फजिती करतोस म्हणून सोय तुझी पाहीन
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

कविताचोरांस मार्गदर्शन भाग-2

कविताचोरांस मार्गदर्शन भाग -2
रात्री उशिरापर्यंत जागून आम्ही लिहलेल्या 'कविताचोरास मार्गदर्शन' या लेखास मिळालेली अपार प्रसिद्धी आणि अगदी सकाळी सकाळी आम्ही जेव्हा इमेलचा इनबॉक्स उघडला तेव्हा त्यात आपण दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे आम्हास भलतीच प्रेरणा मिळाल्याने हा लेखप्रपंच न राहावून आम्ही हाती घेतला आहे, त्यात कविताचोरांचे हक्क अबाधित रहावे हे आमचे प्रमुख ध्येय असल्याचे आम्ही पुन्हा मुद्दामहून नमूद करत आहोत.
अगदी काल काल आमच्या निर्दशनास आलेली घटना म्हणजे आपल्याच कुणा एका सन्माननीय महोदय यांनी काल कुणा कविमार्फत चालवली जाणाऱ्या एका ऑनलाइन नियतकालिकाची "साहित्य पाठवा" अशा आशयाची जाहिरात हातोहात चोरल्याचे समोर आले आहे.हे गैरबीर कृत्य आहे असे नाही मानले तरी उगीच टाईप करण्याची तसदी का घ्यावी हा आम्ही करत असलेला विचार कविलोक का करत नाही हे न कळणारे आहे. आमच्या मागाहून हे ही लक्षात आले आहे की त्यांनी केलेली जाहिरात चोरी ही सुद्धा साहित्याच्या सेवेसाठीच केली आहे ते ऐकून आमचा कविता,साहित्य चोरांबद्दलचा आदर द्विगुणित झाला आहे.
याबाबत एक महत्वाची गोष्ट आम्ही आमच्या कविता/साहित्यचोर मित्रास अतिशय अनुभवाने सांगू इच्छीतो ती ही की, आज बरेच कवी लोक कविता वगैरे लिहत असले तरी सरसकट कोणतीही कविता चोरण्याच्या मोहात पडू नये. शक्यतो मार्केट मध्ये चालेल अशीच (दर्जेदार वगैरे असं काही तरी म्हणतात तशी) कविता अतिशय निर्लज्जपने चोरावी. सुमार दर्जाच्या कविता चोरुन काहीही उपयोग होत नाही.त्या कोणीही वाचत नाही त्यामुळे त्या आपल्यालाच वाचत बसाव्या लागतात आणि आपला मौल्यवान वेळ उगीच वाया जातो. कविता चोरीला गेली म्हणजे नक्कीच दर्जेदार होती असा एक मापदंड कविवर्गात रूढ़ झालेला आमच्या ऐकण्यात आलेला आहे.त्यामुळे कधिकधी ते कवी अशावेळी विनाकारण खुश होतात, त्यामुळे अशी चुक आपल्याकडून अजिबात होता कामा नये.
या बाबत काळजी घ्यावी.
कविता/साहित्यचोरी ही कला आहे आणि त्यामुळेच आधीच अस्तित्वात असलेल्या 64 कलेत कविताचोरी या 65 व्या कलेची भर घालण्याची कल्पना आमच्याशिवाय कुणाच्याही लक्षात कशी आली नाही याचे आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटते.
कारण कविता चोरी करने निश्चितच वाटते तितकी सोपी कला नाही.त्यासाठी सहनशक्ति असावी लागते कारण पकड़ले गेल्यावर मुळ कवी लेखक यांचे नाही नाही ते बोलणे सहन करण्याची प्रचंड क्षमता कविताचोरात असते.याशिवाय साहित्यरूचीहीनता,निर्लज्जता, अकलात्मकता, आदि गुणांची गरज असते ते वेगळेच.त्यामुळे कविताचोरीस 65 वी कला म्हणून बहुमान मिळत नाही तोपर्यंत आम्ही कदापिहि स्वस्थ बसणार नाही.
कविताचोरास समाजात मानाचे स्थान मिळण्यासाठी लढ़ा- बिढा उभारण्यास सर्व कविताचोरांनी संघटित होण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.यासाठी लवकरच गुपचुप कविताचोरांची नोंदणी हा कार्यक्रम ही हाती घेत आहोत.
कविताचोर हा शब्द सरळढोपट वापरला जात असला तरी आमच्या अतिशय दीर्घ अशा अभ्यासातून कविता/साहित्यचोरांचे आम्ही काही प्रकार केले आहे ते अतिशय दुर्लभ ज्ञान आपणांस सांगत आहे,
1) स्वार्थी कविताचोर : या प्रकारचे कविताचोर हे कवीचे नाव काढून त्याठिकाणी आपले नाव टाकून फॉरवर्ड करतात. ह्या व्यक्ती स्वार्थी व पोकळ प्रसिद्धीच्या मागे असतात.त्यांचे साहित्य,कविता यावर अजिबात प्रेम नसते.
आपली कवी बनण्याची अतृप्त इच्छा ते अशा रितीने पूर्ण करु इच्छितात, अशा व्यक्ती कधीच  कवी बनू शकत नाही.
2) असंवेदनशील कविताचोर: या प्रकारचे लोक हे कविता कॉपी करुन कवितेखालील कवीचे नाव काढून निनावी कविता forword करतात.हे स्वतः चे नाव टाकत नसले तरी त्यांची मुळकवीला श्रेय देण्याची अजिबात मानसिकता नसते, तसेच कला हि कुणाची तरी बौद्धिक प्रॉपर्टी आहे ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येत नाही.पापशालनार्थ ह्याच व्यक्ती पुढे अशा कवितेवर "*हि कविता कुणाची आहे माहीत नाही पण ज्याची असेल त्याला लाख सलाम*' असं काही बाही लिहून  कविता फॉरवर्ड करत असतात.
असे अनेक प्रकार करता येतील पण हे मुख्य प्रकार आहेत.
जाता जाता एक कानगोष्ट आम्ही आपणांस सांगून जात आहोत ती ही की, कवी या जगात काही तरी नवनिर्मिती करत असतो, समाजभान जपत असतो, मात्र समाजात जोपर्यंत ती दृष्टी निर्माण होत नाही तोपर्यंत कविताचोराला काहीही मरण नाही, ते निर्लज्जपणे, असंवेदनशिलपणे कविता साहित्य चोरत राहतील.
"कविताचोरांचे भवितव्य" ह्या अतिशय महत्वाच्या विषयावर उद्या व्याख्यान द्यावयाचे असल्याने काही मुद्दे चोरावयाचे बाकी आहेत, त्यामुळे तूर्तास आपली रजा घेतो आहे.
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com
(ता.क :- आम्ही आता लिहलेला हा लेख ही चोरीला जाण्याची दाट भीती असल्याने आम्ही आधीच तो रजिस्टर वगैरे करुन पाठवत आहोत )

कविताचोरांस मार्गदर्शन...

कविताचोरी चे वाढते प्रमाण बघता या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या व नाव गमावू इच्छिणाऱ्या सर्व नवोदित उमेदवारांना मार्गदर्शन पर काही उपदेश ( जे कि आम्ही सुद्धा इकडून तिकडून ढापले आहेत हे तुम्हाला कळू न देता ) देणे हे आम्ही स्वतःच आपले कर्तव्य समजतो. 
या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी काही गोष्टी अगदीच काळजीपूर्वक ध्यानात घेणे आवश्यक आहे त्यात मुख्यतः जेव्हा तुमच्या हे लक्षात आले की अगदी मुंग्या येईपर्यंत विचार करुन हि आपल्या मूलतः जड असलेल्या डोक्यातून काव्य किंवा लेख असे ज्याला म्हणता येईल असे काहीही निघत नाही हे प्रथमदर्शनी तुमच्या ध्यानात आल्यावर या क्षेत्राकडे वळण्यास हरकत नाही.मात्र आपल्याला काही सुचत नाही ही गोष्ट आपल्या स्वतः व्यतिरिक्त इतर कुणालाही कळू देऊ नये किंवा ती गोष्ट कुणाला कळतच नाही असा स्वतःच स्वतः चा गैरसमज करुन घ्यावा. तसेच आपल्याला कविता लेख साहित्य याची खूपच आवड आहे हे ही वरचेवर दाखवावे, आणि त्यासाठी आपण ते ज्ञान कुठूनही मिळवण्याची तयारी ठेवतो अशी प्रतिमा तयार करुन ठेवावी (ह्याचा फायदा पुढे कुठून ही कविता किंवा लेख चोरतानाही होतो)
कविताचोर या क्षेत्रात खूप मागणी (आपल्या भाषेत चोरी) असली तरी उत्तम साहित्यचोर बनण्यासाठी काही युक्त्या आम्ही चोरुन आणलेल्या साहीत्यात वाचावयास मिळालेल्या आहेत, त्या गुपचूप आपणापुढे सांगत आहे, त्यात सर्वात महत्वाचे टेक्निक म्हणजे copy-पेस्ट हे होय, कॉपी केल्यावर पेस्ट करण्यापूर्वी निर्लज्जपणे मुळकवीचे किंवा लेखकाचे नाव खोडून त्या ठिकाणी आपले नाव घालण्यास अजिबात विसरु नये. आणि हे करताना लाज किंवा शरम अजिबात बाळगू नये. सुरवातीला असे करताना थोडी भीती किंवा लाज वाटेल त्यामुळे हळूहळू आपल्या मनाला असंवेदनशील बनवत न्यावे जेणेकरून आपण हे पुण्याचे काम बिनदिक्कत करु शकू.
आपण चोरलेल्या कविता आपल्या प्रेयसी इत्यादींना पाठवून काही दिवस प्रेमाचा पाऊस ही पाडून बघावा, आपणास फारशा ओळखत नसलेल्या मित्रांना अधूनमधून पाठवत जावे. अशा गोष्टीमुळे बरीच तात्पुरती प्रसिद्धी मिळवता येते. असे करताना एक काळजी घ्यावी ती अशी की आपल्या मराठीच्या शिक्षकांना व आपण मराठीत "ढ" आहे हे ज्यांना ठामपणे माहीत आहे अशांना आपल्या चोरलेल्या कविता आपले नावं टाकून पाठवू नये. यामुळे आपली उरली सुरली इज्जत जाण्याची दाट शक्यता आहे.
 नवख्या कविताचोरांनी या क्षेत्रात काळजी घेणे आवश्यक आहे.आमच्या कानावर आलेल्या अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटना कविताचोरांच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या आहेत, त्यामुळे आम्हाला उगीच चिंता वाटून राहते.यात अलीकडे काही कविताचोर यांनी कविता चोरल्यानंतर पकडले गेले आहे आणि मूळ कवीने पकडल्यावर त्यांना झापण्यात आले आहे. व बरीच नाचक्की हि त्यांच्या वाट्याला आलेली आहे, हि बाब निश्चितच स्वागतार्ह नाही, त्यामुळे असे कधी पकडले गेल्यावर भांडत बसू नये, आपण आधीच सोडून दिलेली लाज अजून थोडी सोडण्यात धन्यता मानावी, आणि आपला हेतू बेतू अजिबात तसा नव्हता किंवा अगदी अपवादात्मक चुकीने ते गैर (?) कृत्य घडल्याचे त्वरित कबुली देऊन 5 ते 10 वेळा क्षमा मागून घ्यावी व पुढे तसे काही निर्दशनास येणार नाही ही काळजी घेऊन आपला हा आदर्श धंदा चालू ठेवावा.
तंत्रज्ञान वाढल्यामुळे आणि facebook, whatsapp इत्यादी तत्सम सोसियल मीडियामुळे आपले हे कविता व साहित्यचोरीचे महान कार्य बर्याच अंशी सोपे झाले असले तरी अजून बर्याच गोष्टी या क्षेत्रात काम करणाऱ्या चोरांसाठी होणे आम्ही इष्ट समजतो.
कविताचोरांसाठी साहित्यसंमेलनासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, उत्कृष्ट कविताचोरांना पुरस्काराने सन्मानित (इतर लोकांच्या दृष्टीने 'अपमानित') करावे, वयोवृद्ध कविताचोरांना पेन्शन द्यावे, कविताचोरास प्रोत्साहन योजना जाहीर कराव्यात इत्यादी विषयाबाबत मुख्यमंत्र्यासोबत पुढच्या आठवड्यात आमची महत्वाची बैठक असल्याने त्यात ते विषय आम्ही नक्कीच लावून धरणार आहोत.आणि त्या बैठकीत आपल्या मागण्या प्रभावीपणे कशा मांडता येतील यासाठी काही मुद्दे आम्ही मागच्याच आठवड्यात चोरुन ठेवलेले आहेत.
या शिवायही अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आम्ही इतर ठिकाणाहून ढापुन-ढापुन (आपल्या भाषेत संपादित करुन) आम्ही मांडत राहूच. जाता जाता एक कानगोष्ट आम्ही आपणास सांगून जात आहोत ती ही कि कविता, साहित्य यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व त्याची हृदयापासून आवड असणाऱ्या लोकांनी या क्षेत्रात अजिबात पडू नये, जन्मतः हरामखोरी करण्याचा अभिजात गुण असणार्यासाठी हे क्षेत्र आहे, आपण कवी नाहीत कविताचोर आहोत याचे स्मरण हि कविताचोरांनी अधूनमधून करावे. आपल्याला हितोपदेश करणे हे महत्वाचे कार्य असल्यामुळे व हि परंपरा अखंड चालू ठेवणे अगदीच इष्टकर्तव्य असल्याने आम्ही धन्यता मानतो आहे. असो बर्याच कविता कॉपी पेस्ट करावयाच्या असल्यामुळे आपला तूर्तास निरोप घेत आहोत
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

(ता.क :- आम्ही आता लिहलेला हा लेख ही चोरीला जाण्याची दाट भीती असल्याने आम्ही आधीच तो रजिस्टर वैगरे करुन पाठवत आहोत )


माझे म्रुत्यूगीत...


जीवन....


एक दिवस सुखाचा...


निर्लज्जांचा संग नको देऊ देवा...


सुखामागे धावता धावता...


एक सकाळ उजेडाची...


तर्हा...


पांडूरंगा तुझ्या दर्शानाची आस...


विश्वास...


स्वप्न आणि वास्तव...


देवाचे customer care...


पाऊस...


अप्रिय आतंकवाद्यास...


आई...


माती...


काल आज आणि उद्या...


एक क्षण प्रेमाचा...


कँलेंडर...

कँलेंडर

कँलेंडरची पाने चाळता-चाळता सहज विचार आला मनात
संपत आले हे ही वर्ष, अगदी थोड़ेसेच दिवस राहिलेत शिल्लक...
आयुष्याची एक-एक वर्ष पालटून जातात किती सहज ना...
रोज दिवस उगवतो...
रोज मावळतो...
एक एक दिवस पोटात साठवतो...
मागच्या तारखांवर नजर फिरवताता,
काही दिनांकावर रेंगाळत राहते मन बराच वेळ...
त्या सुखद आठवणी होतात ताज्या आणि मनाला जाणवतो एक सुखद गारवा...
काही तारखा उगीच करतात जखमा ताज्या आणि अश्रुंचा बांध जातो फुटून...
सुख-दुःखाच्या तारखा...
हास्य-अश्रुंच्या तारखा...
मान-अपमानाच्या तारखा...
विश्वास- बेईमानीच्या तारखा...
खऱ्या-खोट्याच्या तारखा...
हव्या-नकोशा तारखा...
प्रेम-द्वेषाच्या तारखा...
आपल्या परक्याच्या तारखा...
ऊन-सावलीच्या तारखा...
अशा अगणित तारखा येऊन जातात वर्षभरात...
आणि वर्षाच्या शेवटी मागे वळून बघताना
मनात एक वेगळीच हुरहूर तशीच राहते टिकून...
आणि मनात विचार येतो...
आता येईल नवीन कँलेंडर आयुष्याच्या वेगवेगळ्या तारखा घेऊन...
© राजेश खाकरे
http://rajeshkhakre.blogspot.in

प्रश्न... ?

 प्रश्न...
प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते हे जरी खरे असले...
काही प्रश्न मात्र असतात बिना उत्तराची...
उत्तर शोधता शोधता प्रश्न पडत राहतात...
प्रश्नच वाढत जातात,उत्तर मात्र हाती नाही येत...
मग मनच भावनाशील बनतं...
आणि घालत बसत समजूत स्वतः ची...
 कोण बरोबर कोण चूक हा गुंता वाढतच जातो...
आणि हा गुंता सोबत घेऊनच दिवस ढकलत जातो...
कधीतरी सापडेल उत्तर ही आशा बाळगून...
रोज सूर्योदय होतो आणि सूर्यास्त..
माणसाचं जीवनही तसंच उदय असो की अस्त
त्याला तसंच लाल-केशरी बनावं लागतं.
 दुःख उराशी बाळगून त्यालाही हसावं लागतं,
कधी मात्र हे हास्य उर पिळवटून टाकतं. एका अनामिक अपराध्यासारखं...
आणि मग एक लाट येते उन्मळलेल्या मनात
 उत्तर नसलेल्या प्रश्नांची...
~राजेश खाकरे

सर ,जरा माझं निलंबन करता का..?

➡सर ,जरा माझं निलंबन करता का..?😪

(पालम पंचायत समिती  (जि.परभणी)चे गटविकास अधिकारी यांनी mregs च्या कामकाज करताना येणाऱ्या दबावामुळे मा. विभागीय आयुक्त यांच्याकडे स्वतः च्या निलंबनाची मागणी केली. ही घटना सर्व प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणांना  व् सरकार यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. यासारख्या कित्येक घटनांनी ग्रामसेवकाचा ही सर्रास बळी जातोय.त्यांचे पत्र वाचून सुन्न झालेल्या मनातून उमटलेली त्यांची व्यथा..,)

🔴सर ,जरा माझं निलंबन करता का..?😪🔴
                ✒राजेश खाकरे

mregs मधून मला थोडं बाहेर काढता का?
सर ,जरा माझं निलंबन करता का..?

रोजगार मिळावा मजुरांना प्रयत्न नेहमीच असतो
पण नाहक दबावाने इथे बळी माझा जातो
माझा रक्तदाब थोड़ा कमी करता का?
सर ,जरा माझं निलंबन करता का..?

कागदावरती एक अन् प्रत्यक्षात दुसरेच काही
मला सांगा खोटारडा हा अट्टाहास कशापायी
कुटुंबासाठी थोडसं मला जगू देता का?
सर ,जरा माझं निलंबन करता का..?

मलाही करायची आहेत विकास कामे खुप
राबत असतो त्यासाठी मी ही रात्रंदिन
आजारापेक्षा उपाय भयंकर ध्यानी घेता का?
सर ,जरा माझं निलंबन करता का..?😪😪😪
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

ओघळलेले अश्रू...

ओघळलेले अश्रू गाली नाही असेच सुकणार
काळजाला भेगा पाडून त्यात ते शिरणार
उद्याच्या प्रचंड क्रांतीची ज्योत त्यात पेटणार
तुझे अश्रू ज्वाला बनून धगधगत राहणार

नाही अश्रू कमजोर हे ना असे लाचार हे
आणिले गाली हे ज्यांनी भस्म तो होणार
दोन तपाचे कष्ट अविरत, अखंड व अविचल
दाखवतील परिणाम तयाचे व्यर्थ ना जाणार

तुझ्या अश्रुंची किंमत जाणतो आई तव सूत
फाटेल धरणी जर ओघळला कधी तो अलगद
या जगाच्या परमेशाची असे आई मज शपथ
अश्रू तुझे हेचि ठरतील शत्रूच्याअंताचे कारण

अश्रू हे बनतील ज्वाला होतील ते निखारे
पेटवतील गनिमास झोंबुनी प्रचंड शहारे
हे अश्रू असेच ओघळले समजू नका रे
अश्रू नव्हे अस्र असे हे जे तुम्हा संहारे
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

आज खुप एकटं एकटं वाटतं...

आज खुप एकटं एकटं वाटतं
जणू कळपातून कोकरु हरवल्यागत

जगाच्या भाऊगर्दीत ज्याला आपलं मानलं
त्यालाच आपल्या इज्जतीचे वाभाडे काढ़ताना बघून मनाचा थरकाप ही उडाला
अन कीव ही आली स्वतःची
नशीबाच्या नावाची बदनामी तरी किती दिवस करणार
वाटले स्वतः वर ही फुटू दे कधी तरी चुकांची खापरं
होऊ दे जे होईल ते, बघ तुझ्याने साहवते ते का ते
अन नाही सहन झाले तर देत जा
आपल्या मनाचा बळी रोज थोडा थोडा
नको करु कुरकुर जर आले तुझ्या माथ्यावर असहय ओझे
झेलत जा तु होईल तुझा ही सराव आणि मग
सराईतपणे बिनाबोभाट तू ही सहन करशील सर्व काही
अन्याय बिन्याय शब्दांचे काय लोणचे घालणार आहे का तु
ते राहू दे कायद्याच्या पुस्तकात
तु मात्र जग अगदी चेहरा हसरा ठेवून
अगदी आनंदी असल्याप्रमाणे
सोपे आहे त्यासाठी थोडसं मन मारत जा स्वतः चे अन निर्लजालाही लाजविल असे काही गुण आत्मसात कर तुझ्यात...
.......
चुकी केल्यावर इथे हीच शिक्षा मिळते !
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

प्रामाणिकपणा...

मला कधी कधी उगीच वाटतं
या जगात प्रामाणिकपणाला काही किंमत नाही.
हि माझी समज विरुन जाते अगदीच हवेत कधी कारण प्रामाणिकपणा हा तर या जगातला स्थायी भावच आहे, ज्याला स्थायी स्वरुपात (कायम स्वरुपी) राहायचे असेल त्यांनी प्रामाणिकपणा सोडता कामा नये, कारण हाच प्रामाणिकपणा देतो तुमच्या हृदयाला एक सात्विक आनंद..तुमचे हृदय ओथंबून वहायला लागेल. तुमचे अंतःकरण ओले होईल, हरामखोरी करुन तुम्ही काही काळ इतरांना फसवुही शकाल पण सर्वात प्रथम तुम्ही त्याची सुरुवात स्वतःला च फसवून करत असता, या जगात कोण किती दिवस जगेल हे सांगणे अगदीच अशक्य आहे मात्र, कसे जगला हे सर्वांना नक्कीच दिसून येते.सत्य आणि प्रामाणिकपणा ह्या अशा गोष्टी आहे ज्या तुम्हाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात...आणि अगदीच कोणत्याही व्यक्तीकडून त्याची अपेक्षाही बाळगू नका आणि तुम्ही किती प्रामाणिक आहात हे ही कुणाला पटवून देत बसू नका, कारण ते आपल्या हृदयाला नक्कीच जाणवत असते...
© राजेश खाकरे
www.facebook.com/rajeshkhakre

"आपलेच दात आपलेच ओठ"

"आपलेच दात आपलेच ओठ"

दांडा कुऱ्हाडीचा तो गोतास काळ झाला
आपल्याच माणसाचा घात त्याने केला

केली सलगी त्याने परकीय माणसाची
अखंड संपविली मग जात लाकडाची

दुसरा कधीच नसतो खरा वैरी या जगात
आपलाच बेईमान जरी तो आपल्या घरात

स्वार्थाविना जगी या नाहीच काही मोठे
अहंकार त्यावर मग कसर ना राही कोठे

हि परंपरा मोठी, नाही ती आज-कालची
दोष कुणा द्यावा ही लढाई 'श्रेयत्वां' ची

आपल्याच पायावरी हा धोंडा आदळलेला
आपलेच रक्त वाहे परि समजे ना हे कुणाला
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

संघर्ष...


एक व्रुक्ष आज लावुया..


मरने पें मेरे...


वेदनेची मधूरिमा....


पेटून उठतोय मराठा...


फक्त तुझं मत पाहीजे...


तुझे शुक्रिया कहता हू भगवान...


म्रुत्यु...


कुणीतरी असतं आपलं ...


राजकारण...


वेदना...


झुकता हू तेरे पांव में मां ....


पैसा...


एखाद्या मध्यरात्रीपासून ...!!!

एखाद्या मध्यरात्रीपासून ...!!!

एखाद्या मध्यरात्रीपासून रदद् व्हावी बेईमानी वागण्यातली
आणि चलनात यावी सच्चाई...
एखाद्या मध्यरात्रीपासून बंद व्हावा अविश्वास मनामनातला आणि नवीन ताजातावाना विश्वास भरावा ह्र्दयात...
एखाद्या मध्यरात्रीपासून रद्दबातल व्हावा स्वार्थीपना संकुचित मनातला
आणि मनात उठावेत तरंग निःस्वार्थ भावनेचे....
एखाद्या मध्यरात्रीपासून संपून जावा द्वेष घाणेरडा
आणि हृदय ओथंबून वहावे निर्मळ प्रेमाने...
एखाद्या मध्यरात्रीपासून वाईट भावना ठराव्यात अवैध
आणि सद्भावना रुजावी प्रत्येक मनामनात...
एखाद्या मध्यरात्रीपासून बेकायदेशिर व्हावी धोखेबाजी
आणि आपलेपणा अंकुरावा माणसाच्या अंत:करणात...
एखाद्या मध्यरात्रीपासून नष्ट व्हाव्यात सर्व चिंता
आणि ऊगवावी एक सकाळ सकारात्मक विचारांची...
एखाद्या मध्यरात्रीपासून माणूस बणावा अगदीच माणसासारखा...
जुन्या वाटा बदलायला त्याने घ्यावा काही दिवसांचा वेळ अधिकृतपणे
पण त्याने बदलावी आपली नियत एखाद्या मध्यरात्रीपासून ....
आणि एकदा त्याच्या नियतीने वाटा बदलल्या की मग
पुन्हा पुन्हा नाही पडणार गरज नोटा बदलण्याची...
हे मात्र घडावेच अगदी एखाद्या मध्यरात्रीपासून.....
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

स्वप्नाच्या हिंदोळणाऱ्या झुल्यावर....

स्वप्नाच्या हिंदोळणाऱ्या झुल्यावर....

अगणित स्वप्नांचे गाठोडे घेऊन माणूस निघतो जगायला...
आणि दिवसागणिक एक एक स्वप्न लागते विरघळायला...
काही स्वप्न निसटतात, काही नजरेआड होतात, तर काही सोडतात जिव गुदमरुन...
विखरुन जाणारे स्वप्न बघून कासाविस होणारा जीव बळेबळेच आवरुन धरताना स्वप्नभंगाचे ओरखडे उमटत जातात मनावर...
मन साहवत जाते...
अश्रुंच्या धारात वाहवत जाते...मनात जपून ठेवलेले सर्व मनोरथ...
ओजंळीतून निसटणाऱ्या पाण्याप्रमाणे स्वप्न जातात अलगद निसटून...
मनात मात्र त्याचा ओलावा तसाच टिकून राहतो कितीतरी काळ...
मग मात्र मन धजावत नाही नवीन स्वप्न बघायला...
स्वप्नाच्या हिंदोळ्यावर झुलताना नाही वाटत कधी पाय घसरुन पडण्याची भीती...
आणि पडल्यावर पुन्हा नाही ठेवावा वाटत पाय स्वप्नाच्या हिंदोळणाऱ्या झुल्यावर....
©राजेश खाकरे
Mo.7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...