मिस कॉल (miss call )

मिस कॉल (miss call)
"""""""""""""""""""'""""'"''''''''''''''''''''''''
मिस कॉल मारण्याची कला जेवढी भारतातल्या त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या लोकांना जमते तशी कुणाही खंडातल्या लोकांना जमते की नाही हे एक नवलच आहे. अगदी एखाद्या रुपयात साऱ्या महाराष्ट्राला फोन लावून ही मिसकॉल मारणारी मंडळी सहज बोलू शकते.फ़ोनचे कॉल रेट वाढले की घटले याच्याशी ह्यांना काही देणे घेणे नसते. खरं तर मिसकॉल म्हणजे काय तर सुटलेला कॉल, जो बराच वेळ वाजला पण उचलता न आल्याने मिस झाला. परंतु आमच्याकड़े मिसकॉल ची स्वतंत्र व्याख्याच बनली आहे.
"आपले पैसे खर्च होऊ न देता, आपलेच काम जरी असले तरी, समोरच्याला कॉल करावयाला लावण्याची अद्भुत कला म्हणजे मिसकॉल होय"
काही जण मिसकॉल मारतानाही खूपच कंजुषी करतात. "ट्रिंग ट्रिं...." इतका छोटासा मिसकॉल मारतील.कधी कधी तर समोरच्याला ते कळत सुद्धा नाही की कुठला मिसकॉल आला ते...यात दूसरी एक पटाईत मंडळी अशी आहे की ते अर्धा मिसकॉल मारतात.म्हणजे साधारणतः 30 सेकंद बेल वाजते फोन ची..आणि फोन उचलेपर्यंत 15-20 सेकंद लागतातच. ते हुशार 10-15 सेकंद बेल वाजू देतात आणि कट करतात. नेमका फोन उचलायची वेळ आणि कट होण्याची वेळ एकच होते.फोन उचणाऱ्याला असे वाटते की आपण फोन लेट उचलला,त्यामुळे कट झाला. आणि तो आपसुक रिटर्न कॉल करतो.
"मिस कॉल मारने हा गर्लफ्रेंड चा मुलभुत हक्क व् अधिकार आहे.आणि तो ती प्रत्येकवेळी बजावते" असा सार्वत्रिक अनुभव आहे. स्वतः हा फोन करुन बोलत असणारी गर्लफ्रेंड मिळने हा या जगातला जीवंत स्वर्ग आहे आणि असा कुणी लाखात एखादा पुण्यवान असेल की नसेल ही जरा शंकाच आहे.आणि अशा मिसकॉल मारण्यामुळेच कित्येक देशोधडीला लागलेल्या "प्रियकरांना तारण्यासाठी 'मरो मत,JIO" ही योजना आणली असल्याचे आमच्या ऐकीवात आहे. आणि आम्हाला तेव्हा तर चक्कर येता येता राहिली जेव्हा एक मित्राने सांगितले की,त्याची मैत्रीण jio च्या सीम वरुन सुद्धा मिसकॉल मारते.!
एखाद्या ऑफिसातल्या शिपाई किंवा कनिष्ठ स्तरीय कर्मचाऱ्याने त्याच्या बॉस ला मिसकॉल मारला तर एखादेवेळी समजू शकतो,पण असे कित्येक कंजुष बॉस आमच्या पाहण्यात आहे, जे आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचार्याला मिसकॉल करतात. ही मानसिक गरीबीच म्हणावी लागेल.
परवा एका मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एका ठिकाणी बोलणी सुरु केली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना मुलांच्या वडिलांचा मिसकॉल आला तेव्हा त्यांना त्यांच्या कंजूषपणाची चौकशी करायची सुद्धा गरज पडली नाही,आणि ते लग्न मोडले नसते तरच नवल...
आता मिसकॉल मारणाऱ्या व्यक्तीला तुमच्याशी काही काम असतेच असे नाही.तर जास्त वेळा त्यांचेच काही काम असते. बरेच फोनशुर (दानशुर म्हणतात तसे ) लोक प्रत्येक मिसकॉल ला रिटर्न कॉल करत असतात.तर काहीनी हे ठरवून टाकलेले असते की जर समोरच्याला खरच काही काम असेल तर तो direct कॉलच करेल मिसकॉल कशाला मारेल.?
एखाद्या कठिण प्रसंगी अथवा बॅलन्स नसताना हाच मिसकॉल वरदान ठरतो हे हीं विसरुन चालणार नाही.मात्र मिसकॉल चा मोठ्या प्रमाणात miss use करणारी लोकच जास्त झाली आहे.
"आपण ज्याला मिसकॉल मारतो आहे त्या व्यक्तीला काही कमी नाही आणि सर्व दारिद्र्य जणू आपल्याच पदरात पडले आहे" असा एक प्रचंड गैरसमज मिसकॉल मारणाऱ्यानी करुन घेतलेला असतो. आणि अशा मिसकॉल करणार्याला वैतागूनच "कशाला मिस कॉल करतो" यासारखी गाणी बनली असावी असे आम्हाला वाटते.
कुणाचा तरी मिसकॉल आल्याने आम्ही तूर्तास आपली रजा घेतो आहे...नंतर बोलूच...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(ता.क.: आमचा हा वरील लेख आवडला-बिवडला तर डायरेक्ट कॉल करावा.मिसकॉल मारु नये)

ती सध्या काय करते...? (Version 1.7 )

ती सध्या काय करते...?
(Version 1.7 )

ती कधी मायेने त्याचा हात हातात घेते
प्रेमभराने त्याला हृदयाशी धरते
ती कधी रागारागाने खुप भांडून घेते
कधी उगीच हळवी होऊन त्याच्या कुशीत शिरते...

दूर क्षितिजाकड़े बघत कधी एखाद्या सांजवेळी
मायेची ऊब होऊन त्याला धीर देत असते...
जीवनातल्या सुखद दुःखद प्रसंगी मंद हास्यानी ती त्याला विश्व जिंकण्याची प्रेरणा देते ...
त्याने तीच्या केसात माळलेल्या मोगर्याच्या फुलाप्रमाने ती पेरत जाते त्याच्या आयुष्यात समाधानाचा सुगंध...

कधी करते ती हट्ट... तो पुरवतो म्हणून
ती वाचते त्याचे मन एखाद्या पुस्तकाप्रमाने
त्याच्या आणि तीच्या भावना जेव्हापासून एकत्र गुंफल्या आहेत तेव्हापासून...

ती आणि तो करतात एकमेकांवर जीवापाड प्रेम आजही...
प्रेमाचे रुपांतर लग्नात होऊन झाली असतील 10 वर्षे...
तो प्रेमाचा सुगंध तसाच जपून ठेवलाय त्यांनी आजही...

ती आधी ही त्याच्यावर खुप प्रेम करायची...
ती सध्या ही त्याच्यावर खुप प्रेम करते...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.6 )

ती सध्या काय करते...?
(Version 1.6 )

तो सोडून गेला तेव्हापासून...
तीचे विश्वच बदलले
कळीप्रमाणे उमलनारे हास्य अचानक लुप्त झाले....
ती झुरत राहिली त्याच्या विरहात जीवाच्या आकांताने...
तिचा लग्न न करण्याचा अभेद्य निर्धार नाहीच तोड़ता आला कुणालाच...
आईवडीलही विनवण्या करुन थकले...
मात्र ती तशीच राहिली ठाम तीच्या निर्णयावर...
त्याच्याशिवाय तीच्या आयुष्यात दुसरं कुणी नव्हतच जणू...
तीच्या हृदयमंदिरात तिने केली होती जणु त्याचीच प्रतिष्ठापना...
अजून ही तीच्या मनात एक उमेद त्याच्या परतण्याची
अन ते नाहीच घडले तर असेही तिने तीचे आयुष्य केलेच आहे त्याच्या नावावर...
तीच्या आयुष्यात फक्त तोच एकमेव आहे
म्हणून ती जगतेय त्याच्या आठवणीसह
त्याच्यातच सामावून...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते? (Version 1.5 )

ती सध्या काय करते?
(Version 1.5 )

तीच्या आणि त्याच्या प्रेमात जात एखाद्या दुभाजकाप्रमाने आड आली अन दुभंगून गेले त्यांचे आयुष्य...
तीचे ही झाले लग्न वडिलांच्या मर्जीने नात्यातल्याच् कुणा मुलाशी
आज तीचीही मुलगी झालीये 15-16 वर्षाची...
ती सतत ठेवत असते तीच्या मुलीवर लक्ष...
अधून मधून चेक ही करत असते तीच्या मित्र-मैत्रिणीच्या जाती...
कारण तिला वाटत राहते तीच्या तरुण मुलीची काळजी
जे स्वतःच्या वाटेला आलं तेच न यावं मुलीच्या वाटेला म्हणून...
ती जपते तिला आईच्या मायेने...
ती नसेल ही मानत जातिभेद पण तिला माहीत आहेत तीच्या पतीची तत्वे...
तिच्याच वडीलाप्रमाणे आहेत ते ही...
तिला स्वतः ला बसलेल्या ठोकरेचे रक्त भळभळते आहेच अजूनही...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.4 )

ती सध्या काय करते...?
(Version 1.4 )

तिचं नाही होऊ शकलं त्याच्याशी लग्न...
खुप प्रयत्न केलेत दोघांनीही...
नाहीच तयार झाले घरचे तीच्या त्याच्यासोबतच्या लग्नाला...

ती नव्हती तोड़ू शकत नात्याची बंधने...
मग नाइलाजाने घालावा लागला हार दुसऱ्याच्या गळ्यात...
तिनेही सुरु केला तिचा संसार...
सर्व नाते, परंपरा, चालीरिती, सर्वांची मने सांभाळते ती हसऱ्या चेहऱ्याने..
फक्त तीचेच मन नाही सांभाळता आले कुणाला....

तिने केले सर्व निमुटपने सहन...
कारण ती विरोध करु शकत नव्हती...
कुणाचे मन मारु इच्छित नव्हती
ती दगाही देत नाही तीच्या झालेल्या नवर्याला...
तिने एकदाच दगा दिला स्वतःच्याच मनाला...

ती देतेय साथ शरीराने नवऱ्याला
मन तीचे मात्र तसेच अडकून "त्याच्यातच"
कायमचे....
ती देत असते कधी कधी नशिबाला दोष...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.3 )

ती सध्या काय करते...?
(Version 1.3 )

ती कधीच विसरुन गेली त्याला...
उगीच रडत-कुढत जगून काय उपयोग असंच वाटत तिला...
तीच्या आता हे ही लक्षात नाही की तिला आणि त्याला अलग होऊन 5-7 वर्ष झालीत ते...
तीच्या नवर्याचा मस्तपैकी बंगला आहे...
फोर व्हीलर ने दर रविवारी जातात ते फिरायला....
मस्त मज्जा करतात...
तिचा नवरा कुठल्या बड्या कंपनीचा मॅनेजर आहे...गलेलठ्ठ पगार येतो त्याचा...
कपडे लत्ते, शॉपिंग, सिनेमा, टूर सर्वच करता येतं त्यांना...
ती खरंच खुप सुखी आहे,
Enjoy करते आहे ती...
सर्वच आहे तिच्याकड़े...
नसेल तर  फक्त त्याचे प्रेम आणि प्रेमाच्या आठवणी...
आणि त्याची गरज पण नाही तिला...
ती मजेत आहे...!
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.2 )

ती सध्या काय करते...?
(Version 1.2 )

ती आता वेचत असते कपाशी
करते पिकाची खुरपणी
तुरीची कापणीही जमते तिला
गव्हाची सोंगणी, जनावरांचे शेंणपाणी
सगळी कामे करते ती
एव्हढच नाही तर चूल (sorry, गॅस) आणि मूल ही सांभाळते ती
दोन लेकरांची आई आहे ती आता...
कित्येक जबाबदाऱ्या आहेत तिच्यावर
त्यासाठी धडपडत असते ती...

मला माझे करियर बनवायचे आहे
असे सांगून गेली होती ती त्याला सोडून
तिने बराच प्रयत्न करुन ही नाही मिळाली नोकरी
मग बापाने ज्याच्याशी गाठ बांधली त्याच्याशी निमुटपने सुरु केला संसार तीने

आज इतक्या वर्षानंतरही
कधी कधी तीचे मन उगीच बैचेन होते...चुकल्याचुकल्या सारखं वाटतं...
काहीतरी राहून गेलं असं उगीच मनाला वाटत राहतं...
तिला त्याची आठवण येत असेल का...?
करिअर चे निम्मित सांगून आपण त्याच्यापासून दुरावलो ह्याची खंत तर नसेल वाटत तिला...?
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.1 )

ती सध्या काय करते...?
(Version 1.1 )

ती एक चांगली डॉक्टर आहे...
एक नामी डॉक्टर म्हणून नाव आहे तीचे शहरभर...
सर्वच रोगांवर तिला करता येतात अचूक इलाज...
प्रसन्न हसरा चेहरा...सहज मिळून मिसळून वागणारी ती...
तीचे आणि त्याचे मार्ग झालेत वेगवेगळे...
पाच-दहा वर्ष होऊन गेले असतील...
मात्र सर्व रोगांवर अचूक इलाज करायला शिकलेली ती, तिला अजून नाहीच जमले तीच्या मनातल्या रोगांवर इलाज करायला...
त्याचा विषय आला की ती होऊन जाते बैचेन...
सरकन संपूर्ण इतिहास डोकावयाला लागतो वर्तमानात...
तीच्या अन्तर्मनात त्याची छबी अजून ही तशीच...
जणू कालच भेटलो त्याप्रमाण...
ती अचानक मेडिकलच्या पुस्तकाची पाने भराभर पालटून शोधत राहते अशी एखादी tablet...
जिने ठेवता येतील का त्या क्षणांना जिवंत...
जोड़ता येतील का कुठले ऑपरेशन करुन त्या क्षणांना ह्या क्षणाशी...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

ती सध्या काय करते...? (Version 1.0)

ती सध्या काय करते...?
(Version 1.0)

ती तशी बरीच बदललीय
बरीच mature झालीये
तिचा तो सडपातळ बांधा बनलाय काहीसा स्थूल...
चेहऱ्यावर वयाची सावलीही जाणवतेय काही प्रमाणात...
ओढणी सांभाळत कॉलेजात वावरणारी ती आता बिनधास्त वावरते घरादारात...
टापटीप राहणारी ती थोडीसी करते आता चालढकल नटण्या-थटण्यात...
सणावाराच्या निमित्ताने जेव्हा माहेरीं गेल्यावर तिला आठवतात त्या 8-10 वर्षांपूर्वीच्या आठवणी...पण तेवढ्यापुरत्याच...
ती परत स्वतःला गुंतून घेते तिच्या संसारात...जबाबदार्यात...
क्षण कितीही सुवर्णासारखें असले तरी क्षणच ते...निसटतातच ओंजळ रिकामी ठेवून...
आठवणींची कुपी मात्र ठेवलीय तिनेही जपून तिच्या अंतर्मनात... कधी उघडली कि अजूनही दरवळतो त्यातून प्रेमाचा सुगंध...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(मित्रांनो, 6 जानेवारीला "ती सध्या काय करते" या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे...ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे.आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की कळवा.)

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...