ओघळलेले अश्रू...

ओघळलेले अश्रू गाली नाही असेच सुकणार
काळजाला भेगा पाडून त्यात ते शिरणार
उद्याच्या प्रचंड क्रांतीची ज्योत त्यात पेटणार
तुझे अश्रू ज्वाला बनून धगधगत राहणार

नाही अश्रू कमजोर हे ना असे लाचार हे
आणिले गाली हे ज्यांनी भस्म तो होणार
दोन तपाचे कष्ट अविरत, अखंड व अविचल
दाखवतील परिणाम तयाचे व्यर्थ ना जाणार

तुझ्या अश्रुंची किंमत जाणतो आई तव सूत
फाटेल धरणी जर ओघळला कधी तो अलगद
या जगाच्या परमेशाची असे आई मज शपथ
अश्रू तुझे हेचि ठरतील शत्रूच्याअंताचे कारण

अश्रू हे बनतील ज्वाला होतील ते निखारे
पेटवतील गनिमास झोंबुनी प्रचंड शहारे
हे अश्रू असेच ओघळले समजू नका रे
अश्रू नव्हे अस्र असे हे जे तुम्हा संहारे
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...