प्रेम कुणावर करावे...?

प्रेम कुणावर करावे...?

आईच्या सुरकुत्या पडलेल्या चेहर्यावर
बापाच्या करारी, स्वाभिमानी बाण्यावर
प्रेम करावे तिने मनात जपलेल्या स्वप्नावर
आणि बापाच्या निथळलेल्या घामावर

प्रेम कुणावर करावे...?

तिने हार घालून दिलेल्या आयुष्यभराच्या साथीवर
जळत राहते आपल्यासाठी त्या तिच्या मनातल्या वातीवर
तिच्या निखळ हास्यावर, गुलाबी क्षणांवर
उरात जपलेल्या,राबत असलेल्या तिच्या मनातील विश्वासावर

प्रेम कुणावर करावे...?

या विश्वात जे जे सुंदर त्या प्रत्येक चांगूलपणावर,
फुलावर,कळीवर, मधुर त्या बासरीवर
नदीच्या काठावर,गाणाऱ्या ओठावर,
आपल्या आयुष्यात घोंगावणाऱ्या कठीण संकटावर

प्रेम कुणावर करावे...?

प्रेम प्रेमावर करावे,तसेच द्वेषावर करावे,
आत रुतत जाणाऱ्या काट्यावर करावे
प्रेम इतके करावे,मनोमन स्मरावे,
हिशोब शेवटी लावता केवळ प्रेम उरावे
केवळ प्रेम उरावे...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
www.rajeshkhakre.blogspot.com

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...