स्वप्नात आली शाळा
काल रात्री स्वप्नात आली माझी शाळा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा !! धृ !!
दिवाळीचा फराळ तुझा संपला असेल
धिंगा-मस्ती, मौज मजा करून झाली असेल
माझ्या आवारात येऊन थोडे खेळा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा ||१ ||
मामाच्या गावाची सफर कशी केली?
नव्या ओळखी, भेट कुणाकुणाशी झाली?
निबंध लिहून मला गमतीजमती कळवा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा ||२||
तुमच्या त्या किलबिलीची सवय आहे मला
तुम्ही गेला तेव्हापासून जीव व्याकुळ झाला
आल्यावर तुम्ही एकदा स्वच्छ पुसा फळा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा ||३||
- राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com
No comments:
Post a Comment